Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Kolhapur › जपून ठेवली स्टीफन हॉकिंग यांची आठवण

जपून ठेवली स्टीफन हॉकिंग यांची आठवण

Published On: Mar 15 2018 9:23AM | Last Updated: Mar 15 2018 9:29AMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

'ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' या पुस्तकाचे मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. सुभाष देसाई यांनी जगप्रसिद्ध संशोधक स्टीफन हॉकिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. १९९० मध्ये देसाई यांनी 'कालाची जन्मकथा' या नावाने ''ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. यानंतर देसाई यांना हॉकिंग यांनी भेटण्याची वेळही दिली होती. पण, पत्र वेळेत न मिळाल्याने जगविख्यात शास्त्रज्ञाला भेटण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, अशी आठवण देसाई यांनी सांगितली.  

स्टीफन यांच्या निधनानंतर देसाई यांनी त्यांच्या जपून ठेवलेल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की,  स्टीफन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाच्या अनुवादानंतर वर्षानंतर म्हणजे  १९९१ हे वर्ष मी कधीच विसरु शकत नाही. स्टीफन यांनी भेटीसाठी वेळ दिली होती. मी युरोपात फिरायला जाण्यापूर्वी स्टिफन यांना पत्र लिहले. माझ्या पत्राला सकारात्मक उत्तर मिळाले. पण मी युरोपात पोहचल्यानंतर स्टीफन यांच्या कार्यालयातून मला उत्तर मिळाले.  माझ्या मित्रांनी माझ्यापर्यंत हे पत्र पोहचवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात इंग्लंडमधील एका गृहस्थाला मी भेटलोही. पण तुम्ही कोल्हापूरकर रांगडे आहात. एवढा मोठा शास्त्रज्ञ तुम्हाला भेटणार नाही, असे म्हणून त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले.

ज्यावेळी मी भारतात परतलो त्यावेळी त्या गृहस्थाने मला फोन करुन भेटीची वेळ मिळाल्याचे सांगितले. पण मला परत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे स्टीफन यांना भेटण्याचे स्वप्न अपुरेच राहिले, अशी भावना देसाई यांनी व्यक्त केली. कोल्हापूर विद्यापीठातून पीएचडी करत असताना स्टीफन हॉकिंग यांचे 'ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' हे पुस्तक वाचनात आले. या पुस्तकामुळेच स्टीफन  हॉकिंग यांच्यासोबत नाते जुळल्याचे ते म्हणाले.