होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात  समस्त मुस्लीम समजातर्फे ठिय्या आंदोलन

कोल्हापुरात  समस्त मुस्लीम समजातर्फे ठिय्या आंदोलन

Published On: Jul 30 2018 12:19PM | Last Updated: Jul 30 2018 12:41PMकोल्‍हापूर :  प्रतिनिधी

कोल्‍हापुरात सध्‍या मराठा आंदोलन सुरू आहे. समाजातील वेगवेगळ्‍या संघटनांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याच पार्‍श्वभूमिवर मुस्लिम समाजाने घेतलेली भूमिका ही या आंदोलनाला एकजुटीचा संदेश देणारी आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा मुस्‍लिम समाजाने एकजुटीने मराठा आंदोलनास पाठिंबा देण्‍याचे ठरविले आहे.

समाजातील राजकीय नेते , प्रतिष्ठीत व्यक्ती , मस्जिदचे पदाधिकारी मौलाना  यांची याविषयी आज कोल्‍हापुरात  बैठक झाली. कोल्हापूर जिल्हा समस्त मुस्लिम समाजानी  ठिय्या आंदोलनात करण्‍याचे ठरविले आहे.  दिंनाक १ ऑगस्‍टला, बुधवारी सकाळी १० वाजता दसरा चौक येथे समाजातील सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे,  असे जाहीर आवाहन कोल्हापूर जिल्हा समस्त मुस्लिम समाजातर्फे करण्‍यात आले आहे.