Thu, Nov 15, 2018 22:08होमपेज › Kolhapur › मुरगुडात ५ जानेवारीपासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

मुरगुडात ५ जानेवारीपासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:25AM

बुकमार्क करा

मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने आणि लाल आखाडा व्यायाम मंडळ मुरगूड यांच्या वतीने 5 ते 7 जानेवारी दरम्यान लाल आखाडा चषक मॅट वरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी बुलेट व चषक व द्वितीय क्रमांकासाठी प्लॅटिना मोटारसायकल आणि चषक, तृतीय क्रमांकासाठी रोख पंचवीस हजार, चतुर्थ क्रमांकासाठी, रोख पंधरा हजार अशी बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, दगडू शेणवी यांनी दिली.

सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च असणार्‍या या कुस्ती स्पर्धा जीवन शिक्षण शाळा नं 1 च्या मैदानावर घेण्यात येणार आहेत. खुला गट 74 ते 120 किलो वजन आहे अन्य दहा वजनी गट व बक्षिसे अशी.  74 किलो अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 11 हजार व चषक, 65 किलो 11 हजार, 9 हजार, 7  हजार व चषक, 61 किलो 9 हजार, 7 हजार, 5 हजार व चषक, 57 किलो 7 हजार, 5 हजार, 3 हजार व चषक,   17 वर्षांखालील 50 किलो 4 हजार, 3 हजार, 2 हजार व चषक, 46 किलो वजनी गट शहाजी कुमार चषकसाठी राहील व 4 हजार, 3 हजार, 2 हजार व चषक अशी बक्षिसे राहतील. 42 किलो 2 हजार 500, 2 हजार, 1 हजार 500 रु व चषक, 35 किलो (14 वर्षाखाली)  2 हजार 200, 1700 व 1200 व चषक 30 किलो (14 वर्षाखाली)2100, 1600, 1100 रु व चषक, 25 किलो 2000, 1500, 1000 रु व चषक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. खुल्या गटात दोन फेर्‍या पूर्ण करणार्‍या मल्लांना मानधन दिले जाणार आहे. 

स्पर्धेचा प्रारंभ आणि बक्षीस वितरण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळचे अध्यक्ष विश्‍वासराव पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटीलआदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पत्रकार परिषदेस माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले, डॉ सुनील चौगले, सखाराम डेळेकर, अशोक खंडागळे, आदी उपस्थित होते.