Fri, Jul 19, 2019 18:05होमपेज › Kolhapur › तासगाव साखर कारखाना सुरू करा

तासगाव साखर कारखाना सुरू करा

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 10:36PMकोल्हापूर : प्रतिनिधी

तासगाव पलूस तालुका सहकारी साखर कारखाना, तुरची कारखाना येत्या गळीत हंगामात सुरू करावा तसेच या कारखान्याच्या शेतकरी सभासदांचे हक्‍क कायम ठेवावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्‍चितपणे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन मंत्री देशमुख यांनी दिले.सहकारमंत्री सुभाष देशमुख आज कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. आज सकाळी प्रा. पाटील यांनी त्यांची शासकीय विश्रामधाम येथे जाऊन भेट घेतली. यावेळी गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला तासगाव, पलूस सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. 

साखर कारखाना अडचणीत आल्यानंतर 2005 ते 2007  या कालावधीत खासगी कंपनीला हा कारखाना चालविण्यासाठी देण्यात आला. त्यानंतर सहा वर्ष कृषी औद्योगिक संघाने हा कारखाना चालविण्यासाठी घेतला. दरम्यानच्या काळात हा कारखाना राज्य सहकारी बँकेने 14 कोटी 51 लाखाला विकला. याला येथील शेतकर्‍यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीन आंदोलन सुरू करण्यात आले. राज्य बँकेच्या साखर कारखाना विकण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने कारखाना विक्रीला स्थगिती दिली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. हा कारखाना सुरू करण्याबाबत आज प्रा. पाटील यांनी सहकारमंत्री देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. मंत्री देशमुख यांनी यासंदर्भात राज्य बँकेशी चर्चा करून सध्य परिस्थितीची माहिती घेऊ तसेच कायदेशीर काही अडचणी असतील तर त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितलेे. यावेळी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील व शेतकरी संघर्ष समितीचे संजय संकपाळ उपस्थित होते.