Mon, Jan 21, 2019 03:26होमपेज › Kolhapur › मुरगुडात राज्य कुस्ती स्पर्धेस प्रारंभ

मुरगुडात राज्य कुस्ती स्पर्धेस प्रारंभ

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 06 2018 12:26AM

बुकमार्क करा
मुदाळतिट्टा : प्रतिनिधी 

येथील लाल आखाडा व्यायाम मंडळातर्फे आयोजित मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यभरातून  480 मल्ल सहभागी झाले आहेत.

खुल्या गटात प्रथम क्रमांकाच्या  लाल आखाडा चषक,  बुलेट गाडीसाठी मैदानात उतरलेल्या 57 मल्लांमध्ये यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले 40 मल्ल आहेत. माऊली जमदाडे (गंगावेश), अक्षय शिंदे (पुणे), सचिन जामदार (गंगावेश), संग्राम पाटील (देवठाणे),  राहुल सरक (शाहूपुरी), विक्रम शेटे (इचलकंरजी), समीर देसाई (गारगोटी), संतोष लवटे (कोल्हापूर), योगेश बोंगाळे (कोल्हापूर), संग्राम पाटील (जेऊर), शुभम सिद्धनाळे (इचलकंरजी) यांचा  समावेश आहे.    

द्वितीय क्रमांकाला प्लॅटिना व चषक, तर तृतीय क्रमांकाला 25हजार रुपये  व चषक, चतुर्थसाठी15 हजार रुपये रोख व चषक बक्षीस देण्यात येणार आहे.

स्वागत माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले. प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष  संतोष  वंडकर यांनी केले.  सूत्रसंचालन  बटू जाधव यांनी आभार  डॉ. सुनील चौगले यांनी मानले.