Mon, Jun 17, 2019 18:49होमपेज › Kolhapur › सोनाळीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी; दोघे जखमी

सोनाळीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी; दोघे जखमी

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:47AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सोनाळी (ता. करवीर) येथे पूर्ववैमनस्यातून जमावाने किराणा दुकानात घुसून केलेल्या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले. जमावाने पांडुरंग मोरे यांच्या मालकीच्या  दुकानाची तोडफोड करून दहा हजारांचे नुकसान केले.  करवीर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान आबाजी मोरे (वय 47), करण बळवंत मोरे (17, रा. सोनाळी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जयवंत शंकर कापसे, संगीता जयवंत कापसे, प्रथमेश जयवंत कापसे, संभाजी कोडिंबा पाटील (रा. सोनाळी, ता. करवीर) अभिजित  केरबा पाटील, रवी अभिजित पाटील,शोभा अभिजित पाटील (रा. म्हालसवडे, ता.करवीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी रात्री पत्रकारांना सांगितले. पांडुरंग आबाजी मोरे यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल दाखल केली आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमाराला ही घटना घडली.