Sun, Mar 24, 2019 17:03होमपेज › Kolhapur › घनकचरा निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम राबविणार

घनकचरा निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम राबविणार

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेत्या तीन वर्षांत स्वच्छतेची भरीव कामगिरी झाली असून, या अभियानातून कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्‍त झाला आहे. यापुढे शहरी भागात घनकचरा निर्मूलन आणि सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम प्राधान्याने राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालय आणि कोल्हापूर विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने येथील मराठा रिजन्सीच्या सभागृहात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचा प्रारंभ सुभेदार यांच्या हस्ते झाला.

यावेळी माहिती उपसंचालक सतीश लळीत, पत्र सूचना कार्यालय मुंबईचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे, आकाशवाणीच्या सहायक केंद्र निर्देशक तनुजा कानडे, विनायक पाचलग, दशरथ पारेकर, डॉ. रत्नाकर पंडित, विभागीय  माहिती कार्यालयाचे सहायक संचालक एस. आर माने उपस्थित होते. सुभेदार म्हणाले, कोल्हापूर महापालिकेसह आठ नगरपालिका व संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्‍त झाला आहे. कागल पालिकेने घनकचर्‍यापासून वीज निर्मितीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करून दाखविला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी आयोजित  वार्तालाप कार्यक्रमात विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Solid Waste, Eradication, Wastewater Management, Program, Kolhapur