Wed, Apr 24, 2019 08:04होमपेज › Kolhapur › शालार्थ प्रणाली सॉफ्टवेअर ‘ऑफलाईन’!

शालार्थ प्रणाली सॉफ्टवेअर ‘ऑफलाईन’!

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 21 2018 11:00PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन करणारी शालार्थ सॉफ्टवेअर प्रणाली अद्यापही ‘ऑफलाईन’च आहे. आठ महिने होत आले तरी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्याने शिक्षण विभागावर वेतन ऑफलाईन पद्धतीने काढण्याची नामुष्की ओढावली आहे. 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होते. त्यासाठी एका खासगी कंपनीबरोबर करार करण्यात आला. तांत्रिक कारणामुळे शालार्थ प्रणालीत बिघाड झाल्याने 12 जानेवारीपासून सर्व प्रकारच्या शाळांचे वेतन थांबले. ‘एनआयसी’ पुणे संस्थेला वेतन देयक प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी देण्यात आली. पण, गेले आठ महिने होऊनही अद्यापही प्रणाली विकयित करण्यात यश आलेले नाही. शिक्षण विभागाकडून प्रथम 2 फेब्रुवारीस जानेवारी महिन्याचे वेतन ऑफलाईन काढण्याचा आदेश झाला. 18 मे 2018 च्या आदेशान्वये 31 जुलैपर्यंत मुदतवाढ संपली. त्यानंतर वेतन पथक अधीक्षक कार्यालयाने ऑगस्ट महिन्याची वेतन देयके स्वीकारली नाहीत. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला. 

खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती, राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांना निवेदन दिले. जोपर्यंत शालार्थ प्रणाली सुरू होत नाही, तोपर्यंत ऑफ लाईन पद्धतीने वेतन अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर पुन्हा ऑफलाईन वेतनाचा आदेश झाला. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन ऑफलाईनचा तिसर्‍यांदा आदेश झाला आहे. शालार्थ प्रणाली सॉफ्टवेअर केव्हा दुरुस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.