Mon, Sep 24, 2018 17:20होमपेज › Kolhapur › सॉफ्टवेअर कंपनीला दहा लाखांचा गंडा

सॉफ्टवेअर कंपनीला दहा लाखांचा गंडा

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 20 2018 12:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सॉफ्टवेअर कंपनीचा गोपनीय सोर्सकोड वापरून दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसाद विलास जोशी (रा. बाबा जरगनगर) याच्यावर राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अक्षयामृत इन्फोटेक कंपनीचे अशोक बाबुराव बिरंजे (वय 50) यांनी फिर्याद दिली. संशयित जोशी हा कंपनीकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरीस होता.

अधिक माहिती अशी, मंगळवार पेठेतील तस्ते गल्‍लीमध्ये अक्षयामृत सॉफ्टवेअर कंपनी आहे. कंपनीमार्फत शैक्षणिक संस्थांसाठी सॉफ्टवेअर, अ‍ॅटो हजेरीपत्रके बनविली जातात. कंपनीने 25 शाळांचे सॉफ्टवेअर बनविण्याचे काम घेतले होते. सदरचे काम प्रसाद जोशीकडे सोपविण्यात आले होते. सप्टेंबर 2017 पर्यंत काम पूर्ण करण्याचे ठरलेले होते; पण जोशी हा वारंवार चालढकल करीत होता. त्याने कंपनीने दिलेले गोपनीय सोर्सकोड वापरले होते.

त्यानंतर तो पसार झाला आहे. या कामासाठी त्याने सोर्सकोड वापरून सुमारे 10 लाखांचे नुकसान केल्याची फिर्याद कंपनीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.