Mon, Mar 25, 2019 09:15होमपेज › Kolhapur › वाह रे मायबाप सरकार... अजून किती बळी हवेत?

वाह रे मायबाप सरकार... अजून किती बळी हवेत?

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वाह रे मायबाप सुस्त प्रशासन, सरकार.. अजून किती बळी हवे आहेत, अशा तिखट व संतापजनक प्रतिक्रिया नेटिझन्सनी सोशल मीडियावर व्यक्‍त केल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूरकरांच्या धाडसाला जगभरातून सलाम केला जात आहे. 

प्रजासत्ताकदिनी शहराच्या इतिहासातील मोठा अपघात पंचगंगा नदीवर झाला. यात पुण्यातील एकाच कुटुंबातील 12 जणांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेनंतर बचावकार्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीचे, बचाव कार्याचे व्हिडीओ, फोटो फेसबुक, व्हाटस् अ‍ॅॅपवर पाहून अनेकांनी तरुणांचे कौतुक केलेे. दुसरीकडे अपघाताबद्दल संतप्त प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. सुस्त प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहे. फक्‍त कोल्हापूरकरच हे करू शकतो, सुंदर व निर्मळ मदतीची भावना अशा आदरार्थी भावना सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

निवडक प्रतिक्रियावजा मेसेज...

आता तरी जाग आली की नाही?, ‘झोपेतून’ जागे करायला आम्ही सज्ज आहोत, आता आमची सहनशीलता संपली आहे. त्वरित शिवाजी पुलाचे काम सुरू करा, अन्यथा कोल्हापूरची जनता ‘कोल्हापुरी हिसका’ दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही..!

 शिवाजी पुलावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच शासकीय मदतीची वाट न पाहता संयुक्‍त जुना बुधवार पेठ, डांगे गल्ली तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून जखमींना बाहेर काढले. त्यांच्या जिगरबाज वृत्तीला सलाम.. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच..!

 जेव्हा एखाद्यावर संकट येते.. मदतीची गरज असते.. दवाखान्यात न्यायला कोणी नसते.. अशा वेळी तुमच्याशी देणं-घेणं नसूनही तुमच्यासाठी उपाशीपोटी प्रत्येक गोष्टीत धावायला जी तुमच्या नातेवाइकांच्या पुढे दिसतात..अन् गरजेला स्वत:च्या रक्‍ताच्या बाटल्या हसत-हसत देतात. हीच ती चौकातली कार्टी.. गर्व आहे मला मी कोल्हापूरकर असल्याचा..!

 ‘शिवाजी पूल’ अजून किती बळी घेणार?
टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात शिवाजी पुलाचा कठडा मोडून थेट पंचगंगा नदीच्या पात्रात गाडी गेली.. याला जबाबदार कोण? कोणता मंत्री? याच पुलावर कोणत्या तरी महत्त्वाच्या व्यक्‍तीचा जीव गेल्याशिवाय शिवाजी पुलाची प्रश्‍न मार्गी लागणार नाही, असंच वाटतंय..!

 कोल्हापूर हे असं शहर आहे की ते सातत्याने चालणार्‍या कोणत्या ना कोणत्या आंदोलनाने जागृत असते. त्याचवेळी संकटात मदतीलाही धावून पण जाते. शिवाजी पूल दुर्घटनेवेळी कोल्हापूरकरांचे स्पिरीट पुन्हा एकदा दिसले.. सलाम कोल्हापूरकर. 
            (तुमचाच एक पुणेकर)