Fri, Nov 16, 2018 12:57होमपेज › Kolhapur › ‘नेट’कर्‍यांनो, सावधान!

‘नेट’कर्‍यांनो, सावधान!

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 05 2018 1:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकणार्‍यांवर सायबर सेलने कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे ‘नेट’कर्‍यांकडून सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. 

भीमा कोरेगाव येथे दोन गटांत झालेल्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. कोल्हापुरात ठिकठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने तणावात आणखी भर पडली. आज, गुरुवारी दुसर्‍या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. सकाळपासून सोशल मीडियावरून इंटरनेट सेवा बंद असल्याचे मेसेज फिरत होते.

मात्र, खबरदारी म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, दुपारी बारा वाजेपर्यंत काही कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क सुरू होते. पोलिस दलाच्या सायबर सेलनेही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यांचा शोध घेऊन कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.