Fri, Apr 26, 2019 19:55होमपेज › Kolhapur › आतापर्यंत ५६१ कोटींची कर्जमाफी 

आतापर्यंत ५६१ कोटींची कर्जमाफी 

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:16AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत कोल्हापूर विभागासाठी आतापर्यंत 561 कोटी 48 लाख रुपये देण्यात आले आहेत. कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ विभागात सातारा जिल्ह्याला झाला आहे. येथील 85 हजार 171 शेतकर्‍यांना 214 कोटी 63 लाख रुपये मिळाले आहेत. या पाठोपाठ सांगली जिल्ह्याला 173 कोटी 51 लाख, तर कोल्हापूर जिल्ह्याला 173.32  कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

कोल्हापूर विभागातून 6 लाख 49 हजार 355 शेतकर्‍यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज दाखल केले असून, एकूण 11 लाख 44 हजार 560 बँक खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. माहिती बरोबर असलेल्या व कर्जमाफीस पात्र असलेल्या खातेदारांना पैसे देण्यात येत आहेत. आतापर्यंत थकबाकीदारांसाठी 291 कोटी 39 लाख 65 हजार रुपये देण्यात आले आहेत. यात सातारा जिल्ह्यातील 26289, सांगली 25960 व कोल्हापूर येथील 15 हजार 982 शेतकर्‍यांचा समावेश आहे. 

प्रोत्साहनपर अनुदानात कोल्हापूर जिल्ह्यातील 67,528, सांगली 43,950 व सातारा येथील 58,882 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. थकबाकीदार शेतकर्‍यांची सर्वाधिक रक्‍कम 119 कोटी 60 लाख ही सातारा जिल्ह्याला मिळाली आहे. तर प्रोत्साहन अनुदानाची सर्वाधिक रक्‍कम कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे. ही रक्‍कम 109 कोटी 64 लाख इतकी आहे. विभागात कोल्हापूरचे सर्वाधिक म्हणजे 2,57,884 इतके लाभार्थी आहेत.