Tue, May 21, 2019 22:43होमपेज › Kolhapur › युवा महोत्सवातून पथनाट्य वगळा

युवा महोत्सवातून पथनाट्य वगळा

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

युवा महोत्सवातून महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळतो. मात्र, यंदाच्या युवा महोत्सवातून पथनाट्य कलाप्रकार वगळण्याचीच सूचना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. पथनाट्य प्रकारात स्पर्धकांचा सहभाग घटल्याचे कारण देत हा कलाप्रकार स्पर्धेबाहेर ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

समाजातील विविध समस्यांच्या बाबतीत सामाजिक प्रबोधन पथनाट्याद्वारे अनेकदा केले जाते. सामाजिक जागृती करण्याचे काम पथनाट्यातून होते.  अनेक कलाकारांची कारकीर्द पथनाट्यापासून घडलेली आहे. युवा महोत्सवासारख्या मोठ्या मंचावरून पथनाट्य डावलण्याचा विचार करणार्‍या विद्यापीठ प्रशासनाबद्दल कलाकार विद्यार्थ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

कोणत्याही जागेत सार्वजनिक ठिकाणी पथनाट्यद्वारे एखदा विषय प्रभाावीपणे लोकांपर्यंत पोहोचविता येतो. 17 जुलैला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. यावेळी हा मुद्दा चर्चेला येण्याची अधिक शक्यता आहे. या चर्चेनंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.