Sun, Jul 21, 2019 16:55
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सहाशेवर पोलिस सात कि. मी. धावले

सहाशेवर पोलिस सात कि. मी. धावले

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शारीरिक क्षमतेसह तंदुरुस्तीसाठी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत आयोजित सात किलोमीटर पोलिस मॅरेथॉनमध्ये शुक्रवारी पहाटे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह सहाशेवर अधिकारी, पोलिस सहभागी झाले होते. पावसाची रिपरिप असतानाही सारेच तास किलोमीटर अंतर धावले. सात किलोमीटरचे अंतर तीस मिनिटांत पार केले.

पोलिस दलात कार्यरत असताना ताण-तणावापासून मुक्त राहून शारीरिक क्षमता, तंदुरुस्तीसाठी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत अधिकारी, कर्मचार्‍यांना आठवड्यातील प्रत्येक मंगळवार, शुक्रवारीसाठी सात किलोमीटर अंतराची मॅरेथॉन सक्तीची करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मॅरेथॉनला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह परिक्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज, पहाटे पोलिस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत मॅरेथॉनमध्ये अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे सहा वाजता येथील अलंकार हॉल येथून मॅरेथॉन दौड सुरू झाली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, मानसिंह खोचे, अनिल गुजर, वसंत बाबर यांच्यासह 234 कर्मचारी सहभागी झाले होते.

इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, पेठवडगाव, कागल, मलकापूर, हुपरी, चंदगड, गारगोटी या ठिकाणी झालेल्या मॅरेथॉनमध्ये साडेतीनशेवर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वडगाव पोलिस ठाण्यातर्गंत मॅरेथॉनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोकराव पवार व 35 कर्मचारी सहभागी झाले होते.