Sat, Jul 20, 2019 11:24होमपेज › Kolhapur › मोबाईल चार्जिंग करताना शॉक लागून सराफाचा मृत्यू

मोबाईल चार्जिंग करताना शॉक लागून सराफाचा मृत्यू

Published On: Jul 13 2018 1:23AM | Last Updated: Jul 13 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मोबाईल चार्जिंग करताना इलेक्ट्रिक शॉक लागून विजय मोहन जोशी (वय 38, रा. कदमवाडी) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी राहत्या घरी ते मृतावस्थेत मिळून आले. हाताजवळ जळालेला मोबाईल, इलेक्ट्रिक बोर्ड आढळला. लाड यांच्या घरी भाडेकरू म्हणून एकटेच राहण्यास होते. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. 

विजय जोशी अनेक वर्षांपासून कदमवाडीत राहण्यास आहेत. गुजरीत सोनारकाम करीत होते. ते घरीच एकटेच राहण्यास होते. बुधवारी रात्री घरी झोपलेल्या अवस्थेत त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागला. गुरुवारी सकाळपासून दरवाजा बंद असल्याने घरमालकांनी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस हवालदार ए. एस. आपके व आर. एम. तळपे घटनास्थळी आले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता जोशी मृतावस्थेत मिळून आले. 

नातेवाईक आलेच नाहीत

जोशी यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आली. त्यांचे सोलापूर व इचलकरंजीत काही नातेवाईक आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणीही आले नाही. 

मित्रांनी केले अत्यंसंस्कार

जोशी यांच्या एका नातेवाईकाने येण्यास नकार दिल्याने अखेर त्यांच्या मित्रांनी अंत्यसंस्कार केले. शवविच्छेदनानंतर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधी केला.

वीजेचा तीव्र झटका

खोलीत जोशी झोपलेल्या स्थितीत होते. त्यांच्या पायाजवळ इलेक्ट्रीक बोर्ड होता. तर हाताजवळ चार्जिंगला लावलेला मोबाईल चार्जरसह बोर्डमध्ये होता. इलेक्ट्रीक बोर्डही शॉर्ट झाल्याने अंगावरील चादरही जळाली होती.वीजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालातून पुढे आले.