Tue, Mar 19, 2019 05:27होमपेज › Kolhapur › कालकुंद्रीच्या शिवनेरी पतसंस्थेत साडेतीन लाख रुपयांचा अपहार

कालकुंद्रीच्या शिवनेरी पतसंस्थेत साडेतीन लाख रुपयांचा अपहार

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:12AMचंदगड : प्रतिनिधी  

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शिवनेरी सहकारी पतसंस्थेत डेडस्टॉक व इतर मालमत्तेची चौदा संचालकांनी मिळून परस्पर विल्हेवाट लावून 3 लाख 66 हजार 79 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चौदा संचालकांवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सहायक निबंधक एस. बी. येझरे यांनी फिर्याद दिली आहे. 

संचालक कै. लक्ष्मण आप्पाजी सूर्यवंशी (रा. शिनोळी), मारुती सत्तोप्पा पाटील, नारायण बाबू पाटील, मनोहर हणमंत पाटील (रा. कालकुंद्री), अशोक सतबा शहापूरकर, अण्णाप्पा कृष्णा राजगोळकर, विजय अमृतराव देसाई (रा. कागणी), चंद्रकांत तिमाण्णा कुराडे, सुमन शिवाजी कोकितकर (रा. कुदनूर), शिवाजी दत्तू आढाव (रा. कोवाड),  बसवंत भरमाण्णा पाटील, अमृत अल्‍लाप्पा मणिकेरी (रा. होसूर), शिवपुत्र तिमाण्णा पाटील (रा. कल्याणपूर), अशोक लगमा जरळी (रा. दिंडलखोप) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दुय्यम निबंधकांनी निर्धारित केलेली  आठ लाख एक हजार एकोणऐंशी रुपयांऐवजी चार लाख पस्तीस हजार किमतीला संस्थेची इमारत अमृत देसाई यांनी विक्री करून तीन लाख 66 हजार 79 इतक्या रकमेचा अपहार केला. अधिक तपास चंदगड पोलिस करीत आहेत.