Thu, Jan 24, 2019 06:33होमपेज › Kolhapur › विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदासाठी दोन, तर सचिवपदासाठी पाच उमेदवार

विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदासाठी दोन, तर सचिवपदासाठी पाच उमेदवार

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीची छाननी प्रक्रिया शनिवारी झाली. यामध्ये  अध्यक्षपदासाठी दोन तर सचिवपदासाठी पाच उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. निवडणूक  27 फेब्रुवारीला  होणार आहे. परंतु, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहे. अध्यक्षपद कोल्हापूरला तर सचिवपद सातारा जिल्ह्याला असं बिनविरोधासाठी सूत्र निश्‍चित झालं असल्याचे समजते. व्यवस्थापन परिषदेसाठीच्या आठ जागांसाठीचीसुद्धा छाननी प्रक्रिया आज झाली.  

अध्यक्षपदासाठी कमला कॉलेजमधील किशोरी पसारे तर न्यू कॉलेजमधील अभिषेक श्रीराम यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर सचिवपदासाठी कराड तालुक्यातील उंब्रज येथील मंगलाताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालयातील नम्रता काटवटे, सातार्‍यातील अझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील अमिता भिसे, सांगलीतील पलूस येथील आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेजमधील शुभांगी नलवडे , सातारा येथील लॉ कॉलेजमधील विशाल मंद्रे यांचे अर्ज पात्र ठरले आहेत.व्यवस्थापन परिषदेच्या (मॅनेजमेंट कौन्सिल) सदस्य निवडीबाबत दि. 26 रोजी सिनेटची बैठक होणार आहे.