Thu, Apr 25, 2019 12:05होमपेज › Kolhapur › सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांचे नोंदविले जबाब

सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांचे नोंदविले जबाब

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी पुलावरील टेंम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातासंदर्भात सर्वपक्षीय नागरीकृती समितीने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाबाबत उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली. पर्यायी पुलाला विरोध करणार्‍या विरोधकांसह दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मंगळवारी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्यासह पाचजणांचे जबाब नोंदविण्यात आले. 

शिवाजी पुलावरून 26 जानेवारीला झालेल्या टेंम्पो ट्रॅव्हलर अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. नवीन पुलाचे काम बंद पाडून जुना पूल वापरण्यास भाग पाडल्यामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप करत याला जबाबदार अधिकारी व विरोधकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नागरीकृती समितीने पोलिस अधीक्षकांकडे केली होती. या निवेदनाची चौकशी करण्यासाठी उपअधीक्षक सूरज गुरव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.  

आंदोलनांची दखल नाही

शिवाजी पूल कमकुवत बनल्याने पर्यायी नवीन पूल तत्काळ सुरू करावा, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने वारंवार आंदोलने केली होती. या आंदोलनांची दखल घेण्यात आली नाही. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदने व कागदपत्रे अ‍ॅड. विवेक घाटगे व प्रकाश मोरे यांनी पोलिस उपअधीक्षक गुरव यांच्यासमोर  बुधवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना चौकशीकामी बोलाविण्यात आले होते. यावेळी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल घाटगे, अजित सासने, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. नारायण भांदीगरे, अ‍ॅड. कुलदीप कोरगावकर उपस्थित होते.