Wed, May 22, 2019 10:24होमपेज › Kolhapur › 'संसार कधी मोडतोय शरद पवार वाट पाहताहेत'

'संसार कधी मोडतोय शरद पवार वाट पाहताहेत'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

दुसर्‍याचा संसार कधी मोडतोय आणि माझा कधी नंबर लागतो याचीच शरद पवार वाट पाहत आहेत. नांदता येत नसेल तर वेगळे व्हा, या  पवार यांच्या वक्‍तव्याचा खरपूस समाचार घेत ठाकरे यांनी, पवारांनी आम्हाला हे सांगायची गरज नाही. आम्ही जे आता करतोय तेे तुम्ही यापूर्वी सत्तेत असताना केलं असतं तर तुमची अशीच परिस्थिती निर्माण झाली नसती, असे खडेबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

येथील शिरोळ बसस्थानकाचे उद्घाटन व कोनशिला समारंभ ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी यांनी स्वागत केले.

ठाकरे म्हणाले, मी शेतकर्‍यांच्या  व्यथा जाणतो.  आताच सरकार केवळ म्हणायलाच आहे. जी भूमिका आम्ही घेतो ती बरोबर आहे. सरकार चुकत असेल तर आपण कडाडून बोलणारच.  आताच सरकार जनतेला न्याय देत आहे का? जनतेची यावर मते कोणती आहेत हेच आपण या दौर्‍यातून पाहात आहोत. शिवसेनेला कोल्हापूरकरांचा सार्थ अभिमान आहे. सेनेला सर्वात जादा यश याच जिल्ह्याने दिले आहे. आता या पुढे याही पेक्षा जादा यश देणार याची खात्री आहे.

ना. दीपक केसरकर, ना. एकनाथ शिंदे, ना. दादाजी भुसे, ना. विजय शिवतारे, खा. गजानन किर्तीकर, आ. नीलम गोर्‍हे, आ. राजेश क्षीरसागर, आ. सत्यजित पाटील, आ.चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.

शिरोळला शिवकालीन ऐतिहासिक वारसा असल्याने ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व ताराराणी गादी स्मारकास अभिवादन केले आणि श्री दत्त भोजन पात्राचे दर्शन घेतले.