Sat, Jan 19, 2019 09:35होमपेज › Kolhapur › पुलाची शिरोलीत कबड्डी रणसंग्राम

पुलाची शिरोलीत कबड्डी रणसंग्राम

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:07AM

बुकमार्क करा
शिरोली पुलाची : वार्ताहर

येथील छावा क्रीडा मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार दि. 2 ते 5 जानेवारी दरम्यान प्रकाशझोतात मॅटवरील प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ‘कबड्डी रणसंग्राम 2018’ चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. जिल्ह्यातील दहा कबड्डी प्रेमींनी संघ घेतले आहेत. 120 खेळाडूंना संघमालकांनी बोलीने घेतले आहेत. या स्पर्धेसाठी पाच लाखांची बक्षिसे आहेत.

जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रा. संभाजी पाटील, रमेश भेंडीगिरी, आण्णासाहेब गावडे, अनिल पाटील, डॉ. सोनाली सुभाष पाटील, महेश चव्हाण, अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत लिलावाने खेळाडूंची बोली झाली. यासाठी जिल्ह्यातील 350 खेळांडूपैकी 120 खेळाडूंना दहा संघात संघमालकांनी घेतले. यामध्ये पहिल्या विजेत्या संघाला 41,000 रु. दुसर्‍या क्रमांकाला 31,000 रु. तर तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाला प्रत्येकी 11,000 रु. ची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना एलईडी टी.व्ही. आणि रेफ्रिजरेटर व दररोज 17 वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील ही सर्वाधिक मोठी स्पर्धा होणार आहे. यामध्ये मॅकजय फायटर्स, शिवमुद्रा किंग, दौलत वॉरियर्स, माऊली चॅम्प, बाली चॅलेंजर्स, मंथन पँथर, साक्सा योद्धा, सत्यजित चॅलेंजर्स, विदीप टायगर्स, नागाव लायन्स या दहा संघांनी आपला सहभाग नोंदविला  हे. संघनिवडीवेळी ज्या कबड्डी खेळाडूंची जिल्हा असोसिएशनकडे नोंदणी नाही, अशा एकाही खेळाडूला या निवडीत संधी दिली गेली नाही. ही स्पर्धा मंडळाच्या मैदानावर प्रकाशझोतात, मॅटवर होणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उदयसिंह पाटील, भरमा वंदुरे-पाटील, बाबुराव गावडे, कृष्णात हळदे, रघुनाथ गावडे, कृष्णात पोवार आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.