Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Kolhapur › शिरोळ नागरिक, कृती समिती नगरपालिकेसाठी आक्रमक

शिरोळ नागरिक, कृती समिती नगरपालिकेसाठी आक्रमक

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:16AM

बुकमार्क करा
शिरोळ : प्रतिनिधी  

 शिरोळला नगरपालिका स्थापन व्हावी, या मागणीसाठी शिरोळ नागरिक आणि कृती समिती पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या 26 जानेवारी रोजी  सर्व नागरिक काळ्या फिती लावून ध्वजारोहण  करणार आहेत. शिरोळ नगरपालिकेबाबत असहकार सुरू केल्याने शासन विरोधी असहकार दोलन करून सर्व शासकीय देणी थकविणे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामुदाईक पत्रे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

 नगरपालिका कृती समितीतर्फे रविवारी सायंकाळी मकर संक्रांतीनिमित्त सामुदाईक तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी  गरपालिका स्थापन होण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. शिरोळ गावाला खासदार व आमदार असताना नगरपालिका का होत नाही. गावचा विकासात्मक भार ग्रामपंचायतीला पेलवत नाही. कामगारांचे दोन-दोन महिने पगार होत नाहीत, अशी अवस्था आहे. यासाठी नगरपालिका स्थापन होणे आवश्यक आहे, असे मत कृती समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी व्यक्त केले 

 पं. स. सदस्या योगिता कांबळे म्हणाल्या, मी व माझे पद गावापेक्षा  मोठे नाही. नगरपालिका स्थापण्या कामी मी माझ्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. 26 जानेवारी रोजी शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार, ग्रामपंचायत पाणीपट्टी वगळता सर्व शासकीय देणी थकविण्याच्या निर्णयाबरोबर दि. 6 फेब्रुवारीपासून गावातील रोज एक मंडळ शिरोळ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. 

दि. 19 पर्यंत ठिय्या आंदोलनाचे सत्र पूर्ण केले जाणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना नगरपालिका समर्थनार्थ दहा हजारांवर पत्रे पाठविली जाणार आहेत. त्यानंतर शासनाने नगरपालिका स्थापण्याविषयी हालचाली न केल्यास येथील शिवाजी तख्तमध्ये बेमुदत उपोषण केले जाईल, असा पवित्रा जाहीर करण्यात आला.   कार्यक्रमास अमरसिंह पाटील, बजरंग काळे, राकेश जगदाळे, धनाजी चुडमुंगे, अवधूत देसाई, सरपंच सुवर्णा कोळी, अक्षय पाटील, मुकुंद गावडे,  श्रीकांत माने गावडे, सचिन शिंदे,  यांच्यासह  नागरिक  उपस्थित होते.