Wed, Sep 26, 2018 18:02होमपेज › Kolhapur › शिरोळच्या हिताचे राजकारण करा

शिरोळच्या हिताचे राजकारण करा

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:23AMशिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषदेच्या मंजुरीची फाईल अंतिम टप्यात असताना ती मंत्रालयात संबधीत टेबलवर सापडत नव्हती असा सवाल करीत ज्याला कुणाला कशापद्धतीने राजकारण करायचे आहे ते करावे. मात्र हे राजकारण गावाच्या हितासाठी आणि न्यायासाठी असावे असा टोला आ.उल्हास पाटील यांनी शिरोळ येथील जाहिर नागरी आभार मेळाव्यात विरोधकाचे नाव न घेता लगावला. शिरोळ गावासाठी नगरपरिषद मंजूर झाल्यानंतर शिरोळ ग्रामस्थ आणि शासनाचे आभार असा संयुक्त मेळावा आयोजीत केला होता. नगरपालिका कृती समितीतर्फे येथील शिवाजी चौक भाजी मंडईच्या पटांगणात मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महादेवराव धनवडे होते. विशेष प्रयत्न करून शिरोळला नगरपरिषद मंजूर करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल शिरोळ ग्रामस्थ व कृती समितीतर्फे आ.उल्हास पाटील यांना चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

आ.पाटील म्हणाले, शिरोळकरांची वेगवेगळी आंदोलने, एकीची वज्रमुठ यामुळेच शासनाला नगरपालिका मंजूर करावी लागली. शासन कोणतेही असो धोरण तेच असते असे सांगून शिरोळच्या विकासाला निधी कमी पडणार नाही याची ग्वाही दिली. नागरी आभार मेळाव्यात आ.प्रकाश अबिटकर, रावसाहेब देसाई, दिलीपराव पाटील,  अमरसिंह पाटील, बजरंग काळे, पृथ्वीराज यादव आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच सुवर्णा कोळी, नागरीक उपस्थित होते.