Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : शिरढोण पूल पाण्याखाली, इचलकरंजी-कोल्हापूर मार्ग बंद

कोल्‍हापूर : शिरढोण पूल पाण्याखाली, इचलकरंजी-कोल्हापूर मार्ग बंद

Published On: Jul 14 2018 8:30AM | Last Updated: Jul 14 2018 8:30AMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरढोण पूल आज पहाटे पाण्याखाली गेला आहे. यामुळे इचलकरंजी टाकवडेकडून जाणारा मार्ग बंद झाला आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी  वाढ झाली आहे.

दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी ५४ फूट ६ इंचावर गेली आहे. यामुळे तेरवाड बंधारा ५४ फूट ६ इंच, शिरोळ बंधारा ४५ फूट ६ इंच व नृसिंहवाडी दिनकरराव यादव पूल ४३ फूट ९ इंच इतके पाणी पातळी आहे.   

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्र व पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने  पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन यापूर्वी तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा, कुरूंदवाडचा अनवडी नदी बंधारा व राजापूर बंधारा हे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेच्या पाणीपातळीत रात्रीतून अडीच फुटाने वाढ होऊन ५४ फूट ६ इंच पाणी पातळी झाल्याने शिरढोण पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून २ फुटाने पाणी वाहू लागले आहे.

वाहनधारकांना इचलकरंजी कोल्हापूरकडे जाण्याचा जवळचा मार्ग आहे मात्र पूल पाण्याखाली गेल्याने तो मार्ग बंद झाला आहे. शिरढोण टाकवडे परिसरात शेती असणाऱ्या शेतकर्‍यांचाही मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद झाला आहे.