Sun, Jan 20, 2019 13:24होमपेज › Kolhapur › शिंगणापूर सरपंचांना जीवे मारण्याची धमकी

शिंगणापूर सरपंचांना जीवे मारण्याची धमकी

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:53AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शिंगणापूर गावच्या सरपंचांना जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर हिंदुराव पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  गावातील मरगाई मंदिरनजीक शिवीगाळीचा हा प्रकार घडला. याबाबत सरपंच प्रकाश शामराव रोठे (वय 35, रा. माळवाडी, शिंगणापूर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादी प्रकाश रोठे शिंगणापूर गावचे सरपंच आहेत. पंचायतीचा निलंबित कर्मचारी संजय चौगले यास कामावर घेण्याच्या कारणावरून सदस्य जालिंदर यांचा शुक्रवारी रोठेंसोबत वाद झाला. गावातील मरगाई मंदिरनजीक भररस्त्यावर हा प्रकार घडला. जालिंदर पाटील यांच्यासह सागर चौगले व सुहास ऊर्फ बंडा चौगले या तिघांनी दमदाटी केली. तसेच मोबाईलवरून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.