Sat, Jan 19, 2019 06:59होमपेज › Kolhapur › शरद पवार आज-उद्या कोल्हापूर दौर्‍यावर

शरद पवार आज-उद्या कोल्हापूर दौर्‍यावर

Published On: Jan 12 2019 1:46AM | Last Updated: Jan 12 2019 1:46AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा होत असल्याने, कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवारीबाबत ते काय बोलतात, याविषयी उत्सुकता आहे. 

शनिवारी सकाळी दहा वाजता पवार यांचे बेळगाव येथे विमानाने आगमन होईल. सायंकाळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शनिवारी कोल्हापुरात त्यांचा मुक्काम असून, रविवारी (दि. 13) त्यांच्या हस्ते गडहिंग्लज येथे दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी विमानाने ते मुंबईला रवाना होणार आहेत.