होमपेज › Kolhapur › शरद पवार आजपासून जिल्ह्याच्या दौर्‍यावर

शरद पवार आजपासून जिल्ह्याच्या दौर्‍यावर

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार रविवारी दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. दोन दिवसांत पवार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांचा दौरा होत आहे.रविवारी दुपारी एक वाजता पवार यांचे कोल्हापुरात आगमन होणार आहे. यानंतर ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाची एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पातळीवरील विविध पक्षांच्या नेत्यांशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर्गत बांधणीबाबतही ते विविध घटकांची चर्चा करणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी रात्री निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजन समारंभासही पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. सोमवारी पवार आजरा तालुक्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. निपाणी येथे त्यांची सभा होणार आहे. सायंकाळी पवार कोल्हापुरात येऊन पुण्याला रवाना होणार आहेत.

Tags : Kolhapur, Sharad Pawar,  visited, district, since, today