होमपेज › Kolhapur › शाहू माने याची वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

शाहू माने याची वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 1:25AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे मार्च 2018 मध्ये होणार्‍या ज्युनिअर वर्ल्डकप शूटिंग स्पर्धेसाठी कोल्हापूरचा नेमबाजपटू शाहू तुषार माने याची निवड भारतीय संघात झाली आहे. केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शाहूने 618.4 गुणांसह वैयक्‍तिक रौप्यपदकासह महाराष्ट्राला एकूण 7 पदके मिळवून दिली. याचबरोबर दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय निवड चाचणीत 623.6 व 620.6 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. 

या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघातील आपले स्थान निश्‍चित करून महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू होण्याचा मान मिळविला. शाहू कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमेन असो.चा खेळाडू असून, वेध अ‍ॅकॅडमीमध्ये सराव करत आहे. सेंट झेवियर्स हायस्कूलचा तो विद्यार्थी असून, त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राधिका बराले-हवालदार, रोहित हवालदार, मुख्याध्यापक फादर जेम्स थोरात, क्रीडाशिक्षक किरण साळोखे, अल्ताफ कुरेशी, मोहन लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.