होमपेज › Kolhapur › शालार्थ सर्व्हर बंद : शिक्षक वेतन लांबले

शालार्थ सर्व्हर बंद : शिक्षक वेतन लांबले

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षण विभागाकडून सुरू केलेल्या ऑनलाईन शालार्थ वेतन प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने 15 दिवसांपासून वेबसाईटचा सर्व्हर बंद आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन उशिरा मिळण्याची शक्यता आहे.

शाळांकडून दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची बिले वेतन पथकाकडे पाठविली जातात. ही बिले शालार्थ वेतन प्रणालीत तयार होऊन वेतन पथकाकडे दिली जातात. शालार्थ प्रणालीचे सर्व्हर बंद असल्याने अनेक शाळांची बिले अपलोड झालेली नाहीत. जिल्ह्यात प्राथमिकच्या 2002 शाळांमध्ये 8 हजार 600 शिक्षक व माध्यमिकच्या 850 शाळांमध्ये सहा हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. ऑफलाईन पद्धतीने वेतन अदा करावे, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केली आहे.