Tue, Apr 23, 2019 07:33होमपेज › Kolhapur › लोकशाही टिकविण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्हा

लोकशाही टिकविण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्हा

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:36PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे संस्कार ज्यांच्यावर झाले आहेत, अशा व्यक्ती दंगली घडविणार नाहीत. तुमचा धर्म उंबर्‍याच्या आत ठेवा. रस्त्यावर फक्त राष्ट्रधर्मच आणला पाहिजे.लोकशाही टिकविण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्हा, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. 

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शाहू छत्रपती फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू विचार व प्रचार परीक्षेच्या बक्षीस वितरण व राजर्षी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. पवार म्हणाले, घराघरांपर्यंत शाहूंचे विचार पोहोचले आहेत. 25 भाषेत राजर्षी शाहूंचे चरित्र लिहिण्याचा आपला मानस आहे. शाहूंच्या कार्यानेच परिवर्तन आणले आहे. यापूर्वी अनेकांनी शाहू महाराजांची बदनामी केली, यापुढे अशी बदनामी खपवून घेतली जाणार नाही. शाहूंचे संस्कार झाले असते तर अशा दंगली घडल्याच नसत्या. अन्य कोणताही अप्रचारास बळी पडायचे नसेल तर शाहू हाच त्यावरचा उतारा असून शाहू हा संस्कार आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत 8 वी ते 9 वी राजर्षी प्रवीण परीक्षेत  तन्मय पाटील, कल्याणी जाधव, समृद्धी खरोशे, सानिका पाटील, मधुरा माने, पद्मभूषण शिखरे, रितेश पाटील, आदित्य पाटील, स्वरूप पाटील, अभयसिंह नलवडे, आदित्य गवळी, अमृता मादाळे, मानसी हिलगे, राजलक्ष्मी सूर्यवंशी, वरूण वरूटे, सानिका भुतल, कादंबरी मोरे, श्रेया जाधव, श्‍वेता शिंदे, अपूर्वा पाटील, वैष्णवी देशमुख.6 वी ते 7 वी राजर्षी प्रबोध परीक्षेत सिद्धी काळे, देविका वरूटे, सिमरन कांबळे, साक्षी कांबळे, श्रावणी पाटील, पायल यलुरे, दीपमाला खोत, मृणाली शिखरे, निर्मित पाटील, प्रेरणा लोहार, साक्षी माने, साक्षी चौगले.4 थी ते 5 वी राजर्षी सुबोध परीक्षेत वैभवी कानडे, सानिका पाटील, आर्या पाटील.  2 री ते 3 री राजर्षी बालसुबोध परीक्षा : आदिती चव्हाण, आदिती पाटील, श्रेया पाटील, निशांत गायकवाड, कौस्तुभ पाटील, शरयू फडतरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. यावेळी  फौंडेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्रुझ, उपाध्यक्ष डॉ. व्ही.के.गरंडे, अबुबकर जावेद, डॉ. बी. के. कांबळे, रंगराव मांगोलीकर, निसार मुजावर, राजश्री वीरकर, दिप्ती पाटील, योगिता वाळवेकर, शबनम पठाण यांच्यासह विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.