Wed, Jul 24, 2019 12:59होमपेज › Kolhapur › पंचगंगा नदीवरील पर्यायी पूल परवानगीसाठी प्रस्ताव पाठवा

पंचगंगा नदीवरील पर्यायी पूल परवानगीसाठी प्रस्ताव पाठवा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या बांधकामास परवानगी मिळविण्यासाठी पुन्हा प्रस्ताव पाठवा, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना दिला.  

शिवाजी पुलास 140 वर्षे पूर्ण झाली असून, दरजा निखळल्या आहेत. पुलाचे अनेक दगड हलले आहेत. पर्यायी पूल बांधण्यात येत असून, त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या परवानगीअभावी उर्वरित 20 टक्के काम रखडले आहे.  अपघातानंतर तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने केंद्रीय पुरातत्त्व विभागास परवानगी मागणीचा प्रस्ताव दिला आहे. पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अंतिम अहवाल प्राप्‍त झाला असून, अहवालात पुलावरून अवजड वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी, असा अभिप्राय दिला आहे, असे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी यावेळी पालकमंत्री पाटील यांना सांगितले.

यावर मंत्री पाटील यांनी,  स्ट्रक्‍चरल ऑडिटचा संदर्भ देऊन पुन्हा प्रस्ताव पाठवा, असा आदेश दिला. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी या प्रस्तावाची प्रत द्यावी, असे खा. धनंजय महाडिक यांनी कांडगावे यांना सांगितले. प्रस्तावासोबत पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या अभिप्रायाची प्रत जोडण्यात येणार असून, त्याद‍ृष्टीने हालचाली सुरू आहेत.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Panchaganga river,  shivaji bridge, permission, Chandrakant Patil,


  •