Wed, Jan 23, 2019 04:27होमपेज › Kolhapur › महाराष्ट्रात येणार्‍या कर्नाटकी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची मागणी

महाराष्ट्रात येणार्‍या कर्नाटकी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची मागणी

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 10:44PMगडहिंग्लज ः प्रतिनिधी

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्‍या विद्यार्थ्यांना कर्नाटक शासनाची स्कॉलरशिप मिळण्याबाबत मार्गसूची शासनाच्या वतीने मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी गडीभागद विद्यार्थी-पालक संघाच्या वतीने कर्नाटक शासनाकडे केली आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक सालासाठी शिक्षण घेत असणार्‍या अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर, अभियांत्रिकी, तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्रात आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना कर्नाटक शासनाची स्कॉलरशिप मिळावी, यासाठी जे आंदोलन केले होते त्याला यश आले. मात्र, इतर मागासवर्गीय, मराठा, लिंगायत, धनगर, शिंपी व इतर मागासवर्गीय आरक्षित विद्यार्थ्यांना कर्नाटकप्रमाणे स्कॉलरशिप मिळावी यासाठी 2016-17 साठी काही अर्ज दाखल झाले असून, प्रशासकीय मागासवर्गीय मंत्रालय विकाससौध बंगळूर यांनी वित्तीय मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला असून, आजतागायत दोन वर्षांची स्कॉलरशिप थकीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज घेण्याची प्रक्रिया 13 सप्टेंबरपर्यंत त्वरित करावी; अन्यथा गावोगावी आंदोलन करणार असल्याची माहिती प्रा. विठ्ठल चौगुले यांनी दिली आहे.