Mon, Mar 18, 2019 19:28होमपेज › Kolhapur › ‘पंचगंगा बचाव’साठी केंदाळ आंदोलन

‘पंचगंगा बचाव’साठी केंदाळ आंदोलन

Published On: Jun 04 2018 3:48PM | Last Updated: Jun 04 2018 3:48PMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथे पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी व पंचगंगा प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवावी या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंचगंगा प्रदूषणमुक्त संघर्ष समितीतर्फे ग्रामपंचायतीसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.

आंदोलकांनी अंगावरचे कपडे काढून जलपर्णी घालून घेत पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकां विरोधात व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील मानेसह तेरवाड,मजरेवाडी,अकिवाट,बस्तवाड, नृसिंहवाडी,औरवाड,कुरुंदवाड परिसरातील नागरिक आंदोलनस्थळी दाखल झाले.