Wed, Sep 19, 2018 22:31होमपेज › Kolhapur › वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक

वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक आहे. ज्येष्ठांचा सांभाळ करा हे कायद्याने सांगावे लागते यासारखे मोठे दुर्दैव नाही, अशी खंत आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

श्री सद्गुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर यांच्या 99 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ट्रस्टच्या वतीने डॉ.अपर्णा अनिलराव देशमुख (जि.जळगाव) यांना ‘माऊली आनंदी पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आ.पाटील बोलत होते. याप्रसंगी आ. पाटील यांनी आभाळ-माया संस्थेला 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. निर्मला, जयराम सुपेकर दाम्पत्याचा सत्कार झाला. यावेळी डॉ. मंगलनाथ महाराज, आनंदनाथ महाराज, शामला सांगवडेकर आदी उपस्थित होते. निरंजन सांगवडेकर यांनी स्वागत केले. भावना सांगवडेकर प्रास्ताविक केले. राम सांगवडेकर यांनी आभार मानले.