Tue, May 21, 2019 00:41होमपेज › Kolhapur › संजय पाटील इऑन कारचे मानकरी(व्हिडिओ)

संजय पाटील इऑन कारचे मानकरी(व्हिडिओ)

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: May 31 2018 11:30PMकोल्हापूर : प्रतिनिधी

क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा, बक्षीस जाहीर होताच शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो वाचकांच्या उपस्थितीत दैनिक ‘पुढारी’ आयोजित थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजना मालिकेतील तिसर्‍या ड्रॉ ची बक्षीस सोडत गुरुवारी उत्साहात पार पडली. या सोडतीत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील संजय जयसिंगराव पाटील हे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस ह्युंदाई इऑन कारचे मानकरी ठरले. वाचकांच्या अलोट गर्दीत राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा सोहळा रंगला.

महापौर सौ. शोभा बोंद्रे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, राजाकाका ई-मॉलचे दीपक केसवानी, सारस इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीनिवास कुलकर्णी, आसमा कोल्हापूरचे अध्यक्ष संजय रणदिवे, ‘फेम’चे अध्यक्ष अमरदीप पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली.

प्रारंभी दै.‘पुढारी’चे सहायक सरव्यवस्थापक (अ‍ॅडमिन) राजेंद्र मांडवकर, वितरण विभागाचे सहायक सरव्यवस्थापक मिलिंद उटगीकर, शहर जाहिरात व्यवस्थापक शरद कोतेकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजनेतील पहिल्या व दुसर्‍या ड्रॉला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील तिसर्‍या बक्षीस सोडतीकडे कोल्हापूरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. प्रारंभी प्रथम क्रमांकाचे बक्षीस इऑन कार या बक्षिसाची सोडत महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते काढण्यात आली. महापौरांनी विजेत्याचे नाव घोषित करताच सभागृहात शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. यानंतर दुसर्‍या बक्षिसाच्या 5 गॅस शेगडीसाठी तिरूपती काकडे, आर. आर. पाटील, अशोक धुमाळ यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. 

तिसर्‍या बक्षिसाच्या 7 क्‍लॉथ ड्राईंग स्टँडसाठी अमरदीप पाटील, संजय रणदिवे, दीपक केसवानी यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. विजेत्यांची नावे जाहीर होतील, तसे सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. चौथ्या बक्षिसाच्या 11 सिलिंग फॅनसाठी संजय रणदिवे, अमरदीप पाटील, आर. आर. पाटील, अशोक धुमाळ, वसंतराव मुळीक यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
 
चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण झाले

शेतात नांगरट सुरू असताना फोन आला की तुम्ही चारचाकी गाडी जिंकली आहे. पहिल्यांदा विश्‍वासच बसला नाही. टोमॅटो एफ.एम.वरून बाबुराव टोमॅटो केचअप करत असेल असे वाटले. त्यामुळे मुलास खात्री करण्यास सांगितले. त्यानंतर थेट महापौरांनी कार्यक्रम स्थळावरून फोन करून आनंदाची बातमी दिली. घरी जुनी गाडी आहे. नवीन गाडी घेण्याच्या विचारात होतो. दै.‘पुढारी’मुळे गाडीचे स्वप्न पूर्ण झाले.  

- संजय पाटील

बक्षीस वितरण लवकरच...

‘पुढारी’ 3 स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजनेंतर्गत तिसर्‍या लकी ड्रॉ बक्षीस वितरणासंबंधी निवेदन लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहेत. सदर निवेदन प्रकाशित झाल्यानंतरच बक्षीस वितरण सुरू होईल, याची विजेत्या वाचकांनी, विक्रेत्यांनी व एजंटस्नी नोंद घ्यावी असे, आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.