Tue, Nov 20, 2018 03:21होमपेज › Kolhapur › संजय घोडावत ग्रुपतर्फे केरळ, कर्नाटकातील पूरग्रस्तांना मदतीचा हात 

संजय घोडावत ग्रुपतर्फे केरळ, कर्नाटकातील पूरग्रस्तांना मदतीचा हात 

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:24AMकोल्हापूर :

केरळ व कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून कृषी क्षेत्रालाही  मोठा फटका बसला आहे. पुरामुळे तेथे रोगराई देखील पसरली आहे.अशा कठीण परिस्थितीत घोडावत ग्रुपने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पूरग्रस्त भागात जाऊन मोफत अन्‍नाची पाकिटे, कपडे व औषधे पुरविली आहेत. या माध्यमातून घोडावत ग्रुपने पूर क्षेत्रात अडकलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. 

तसेच संजय घोडावत यांनी यावर्षी थायलंड येथे पार पडलेल्या पॅराबॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताला  कांस्यपदक मिळवून देणारी मानसी जोशी हिला देखील बक्षीस स्वरूपात आर्थिक मदत देण्याचे ठरविले आहे.

संजय घोडावत ग्रुपने नेहमीच अशा कठीणप्रसंगी मदत करण्यास पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकीची भावना हृदयामध्ये जोपासणारे व देशसेवेचे व्रत हाती घेतलेले घोडावत यांनी आजवर दीनदुबळ्या लोकांना, अनाथालयांना, शहीद जवानांना, आरोग्य केंद्रांना, अंध अपंग शाळांना, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना, सेवाभावी संस्थांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच उदार भावनेने मदत करतात.संजय घोडावत विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक उपक्रम हाती घेत असतात. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय सेवा योजना, वृक्षारोपण, दत्तक गावे इ. महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जातात. 

याबाबत बोलताना संजय घोडावत म्हणाले, ‘केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. बचाव पथके सातत्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मदतकार्यात अडथळे येत असल्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना अन्‍न आणि पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला अशा ठिकाणी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पोहोचण्याखेरीज पर्याय नव्हता. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांना आम्ही मदत करू शकलो व यापुढे ही अशा कठीणप्रसंगी मदत करण्यास आमचा ग्रुप सक्रिय राहील.