Tue, Nov 20, 2018 03:19होमपेज › Kolhapur › संजय घाटगे, मुश्रीफ हेच आमदारकीचे दावेदार 

संजय घाटगे, मुश्रीफ हेच आमदारकीचे दावेदार 

Published On: Aug 24 2018 12:44AM | Last Updated: Aug 23 2018 11:56PMकेंबळी ः वार्ताहर 

सन 2019 मध्ये होऊ घातलेल्या कागल विधानसभा निवडणुकीसाठी संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघेच प्रमुख दावेदार आहेत. इतरांची सुरू असलेली चुळबुळ योग्य नाही, त्यातूनही ते लढणार असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असा टोला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे यांनी समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता लगावला. 

व्हनाळी (ता. कागल) येथे महिला बालकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय मुलींना सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच एम. बी. पाटील होते.
कागल तालुक्यात आज स्वाभिमानी व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर संजय घाटगे गट हा प्रबळ असल्याचे सर्वज्ञात आहे. या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बळावरच जिल्हा परिषदेतील शिक्षण आणि अर्थ ही प्रमुख पदे कार्यकर्त्यांच्या पुण्याईवरच मिळाली. त्या माध्यमाद्वारेच विविध शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील सामान्यांना उपलब्ध करून देणे मी माझे कर्तव्य समजतो. यावेळी विलास पोवार, ए. वाय. पाटील, वैभव आडके, काकासाहेब सावडकर, सुरेश मर्दाने, के. बी. वाडकर आदींनी मनोगत व्यक्त केले.