Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Kolhapur › सांबरे येथे चोरीसाठी दाम्पत्यावर अ‍ॅसिड हल्ला

सांबरे येथे चोरीसाठी दाम्पत्यावर अ‍ॅसिड हल्ला

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 1:15AMसांबरे : वार्ताहर

सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील कलाप्पा ऊर्फ परशू लक्ष्मण गुरव व पत्नी रेणुका हे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान दळप करून सांबरे-काळामवाडी रोडवरील शेतातील घराकडे जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅसिड चेहर्‍यावर व अंगावर पडल्यामुळे गुरव दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही माहिती गावात समजताच त्यांना नेसरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेहर्‍यावर व डोळ्यांवर गंभीर जखम झाल्याने तत्काळ सीपीआर (कोल्हापूर) येथे दाखल करण्यात आले. 

गुरव दाम्पत्य दुचाकीवरून दळप घेऊन रात्री साडेनऊच्या दरम्यान घराकडे चालले होते. दुचाकीच्या लाईटमुळे त्यांनी अ‍ॅसिड हल्ला करणार्‍यांना ओळखले. ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करून अ‍ॅसिड हल्‍ला करणार्‍या संशयितांना पकडण्याची मागणी केली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, ग्रामस्थांनी संशयितांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अनिल ऊर्फ आनंदा रामू मानगुतकर व मारुती नारायण पाटील (दोघे रा. सांबरे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.