Thu, Apr 25, 2019 03:24होमपेज › Kolhapur › 'मी बच्चा आहे की कोण हे 2019 ला समजेल'

'मी बच्चा आहे की कोण हे 2019 ला समजेल'

Published On: Feb 16 2018 11:43AM | Last Updated: Feb 16 2018 11:43AMसिद्धनेर्ली : वार्ताहर

मी बच्चा आहे की कोण आहे, हे कागलची जनता 2019 ला दाखवेल. भावनिक होऊन जनतेला फसवण्याचे राज्यकर्त्यांचे दिवस आता गेले आहेत. कागलच्या इतिहासात ज्या चुका झाल्या आहेत, त्या वर्तमान काळात सुधारण्याची संधी द्या, असे प्रतिपादन ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.सिद्धनेर्ली येथील आयोजित केलेल्या चर्मकार समाज उद्बोधन मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दत्तात्रय माने होते.

वाचा : खासदार महाडिकांचे काम राष्ट्रवादीविरोधी : मुश्रीफ

राष्ट्रवादीविरोधी काम केल्याचे पुरावे द्या : खासदार महाडिक

घाटगे म्हणाले, कागल तालुक्यात बचत गटाचा वापर फक्‍त राजकारणासाठी केला आहे; पण आता तसे होऊ नये म्हणून कागल तालुक्यातील महिला बचतगटांसाठी उद्योग निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर कागलमध्ये राजमाता जिजाऊंच्या नावाने बझार काढून त्यामध्ये सर्व उत्पादने महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करून ती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. येत्या शिवजयंतीला तालुक्यातील सर्व समाजांतील बांधवांनी एकत्र येऊन अशी शिवजयंती साजरी करू या, की कागलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले पाहिजे. त्यासाठी महापुरुषांना समाजाच्या चौकटीत न बांधता सर्व समाजांतील लोकांनी एकत्र येऊन सगळ्याच महापुरुषांना वंदन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. अनिल पवार, सुनील मगदूम, शिवाजी गाडेकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. 

वाचा : ...‘त्यांची’ जादू विधान परिषदेत दिसली असती : मुश्रीफ

यावेळी अण्णा सांडुगडे, पुष्पलता मगदूम, सुनील मगदूम, अनिल पवार, शिवाजी गाडेकर, सिद्धनेर्लीच्या सरपंच नीता पाटील, मनोहर घराळ, तानाजी माने यांच्यासह चर्मकार समाजबांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक मारुती माने यांनी केले. आभार धनाजी माने यांनी मानले.