होमपेज › Kolhapur › डॉ. प्रतापसिंह जाधव यांना समाजभूषण पुरस्कार

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना समाजभूषण पुरस्कार

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

येथील संत गाडगे महाराज अध्यासनाचा समाजभूषण पुरस्कार दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर झाला आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 9) पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल.

मानवी जीवनाला स्पर्श करणार्‍या नेत्रदीपक कार्याबद्दल संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या वतीने यापूर्वी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर, लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. द. ता. भोसले, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अध्यासनाचे अध्यक्ष रा. तु. भगत यांनी पत्रकात ही माहिती दिली आहे.