कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी
पहिल्या डावातील अधिक्यावर शाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाने पॅकर्स क्रिकेट क्लबवर मात करून ‘अमर ढाल’ चषक क्रिकेट स्पर्धेत आघाडी मिळविली. शाहूपुरी जिमखाना मैदानावरील सामन्यात प्रथम फलंदाजी करत शाहूपुरी जिमखाना संघाने 9 बाद 315 धावा केल्या. यात अक्षय पवार 92, करण कांबळे 50, विशाल माने 33 धावा केल्या.
पॅकर्सच्या प्रतीक सावर्डेकरने 4 तर स्वप्निल रेडेकरने 2 विकेटस् घेतले. उत्तरादाखल पॅकर्सचा संघ 255 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या विनोद सिंगने सर्वाधिक 97, अर्जुन देशमुख 64 धावा केल्या. शाहूपुरीच्या अक्षय पवार व नीलेश गोलगिरेने प्रत्येकी 3 विकेटस् घेतले. दुसर्या डावात शाहूपुरीने 5 विकेटस् गमावून 78 धावा केल्या. यामुळे पॅकर्सला 139 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, त्यांचा संघ 6 बाद 90 धावांपर्यंत मजल मारू शकला.
Tags : kolhapur Amar dhal Cup Cricket
May 06 2018 1:08AM
May 06 2018 1:08AM
May 06 2018 1:08AM
May 06 2018 1:08AM
May 06 2018 1:08AM
May 06 2018 1:08AM