Thu, Nov 22, 2018 16:42होमपेज › Kolhapur › अभिनेत्री सागरिका-क्रिकेटर झहीर खान कोल्हापुरात(व्‍हिडिओ)

अभिनेत्री सागरिका-क्रिकेटर झहीर खान कोल्हापुरात(व्‍हिडिओ)

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:08AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील हॉकीपटू अभिनेत्री आणि कोल्हापूरची कन्या सागरिका घाटगे या नवदाम्पत्यांचे शुक्रवारी कोल्हापुरात आगमन झाले. कोल्हापुरात येताच सायंकाळी त्यांनी करवीर निवासिनी श्री आंबाबाई  देवीचे दर्शन घेतले. झहीर व सागरिका दर्शनासाठी आल्याची माहिती समजताच मंदिरात उपस्थितांनी त्यांना पाहण्यासाठी धडपड सुरू केली. यामुळे मंदिर परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी सागरिका व झहीर यांना गर्दीतून वाट काढत सुरक्षितपणे त्यांच्या कारपर्यंत नेऊन सोडले. 

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झहीर व सागरिका यांचे अचानक आगमन झाले. विद्यापीठ हायस्कूलच्या गेटकडून पोलिस व सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून त्यांना मंदिर परिसरात आणण्यात आले. देवस्थान समितीच्या कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्या  संगीता खाडे, धनाजी जाधव, भाजपचे विजय जाधव, प्रशांत गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.