Sat, Apr 20, 2019 18:26होमपेज › Kolhapur › ‘काळम्मावाडी’ची सुरक्षा राम भरोसे!

‘काळम्मावाडी’ची सुरक्षा राम भरोसे!

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:44PMकाळम्मावाडी : वार्ताहर

महाराष्ट्र राज्यासह कर्नाटकला वरदायिनी ठरलल्या राजर्षी शाहू धरणाची सुरक्षा आता राम भरोसे झाली आहे. यामुळे नागरिक व पर्यटकांतून संताप व्यक्त होत आहे. धरण सुरक्षेसाठी येथे लाखो रुपये खर्च करून चौक्या उभारण्यात आल्या आहेत. पण, आता सेवा निवृत्तीमुळे अधिकारी, कर्मचारी कमी झाले आहेत. मे महिन्यात जवळपास डझनभर कर्मचारी कमी झाले आहेत.  त्यातच सुरक्षेत दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे.

येथील चौकी नंबर 1 मध्ये सुरक्षा कर्मचारी नसल्याने चौकीलाच कुलूप असल्याने गेट उघडे आहे. त्यामुळे येथे गाडीची तपासणी होत नाही. कर्मचारी सेवा निवृतीमुळे इतर चौक्यांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाळ्यात काळम्मावाडीला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. संबंधित विभागाने पर्यटकांसाठी 2 नंबर चौकीपर्यंत धरण पाहाण्यासाठी सोडावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मध्यंतरी इरफान अत्तारचे प्रकरण, नऊ नंबरकडे झालेली आत्महत्या, बागेत मोकाट फिरणारी जनावरे आदी घटना घडल्या असूनही आज काळम्मावाडी सुरक्षा राम भरोसे झाल्यासारखीच आहे. सुरक्षतेच्या कारणास्तव पर्यटकांना पोलिस चौकी जवळ मज्जाव केला जातो. परिणामी, येथे वारंवार वाद निर्माण होत आहेत.  संबंधित विभागाकडून याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.