Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Kolhapur › एस.टी. पलटी होऊन १२ प्रवासी जखमी

एस.टी. पलटी होऊन १२ प्रवासी जखमी

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:22AMकोल्हापूर/रुकडी : प्रतिनिधी

रिक्षाला चुकविण्याच्या प्रयत्नात सांगलीहून कोल्हापूरकडे येणारी एस.टी.बस पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत 12 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. कोल्हापूर-सांगली मार्गावर चोकाक (ता. हातकणंगले) बसथांब्याजवळ गुरुवारी (दि. 10) सायंकाळी ही घटना घडली.

जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांशी प्रवाशांच्या डोक्याला, हाताला गंभीर इजा झाली आहे. जखमी झालेल्यांत अंजली राजेंद्र उपाध्ये (वय 34, रा. गव्हर्मेंट कॉलनी, सांगली), श्रीरंग निवृत्ती चिकुर्डेकर (42, गणेशनगर, सांगली), दीपक बापू घाटगे (32, कनाननगर), अनिल शंकर लाखे (21, कसबा बावडा, ता. करवीर), इंदुबाई बाबुराव पाटील (70, राजेंद्रनगर), सारिका किरण शिंदे (25, जत), जयवंती अशोक चौगुले (70, सांगली), अभिषेक राजेंद्र उपाध्ये (19, सांगली), शीतल किरण शिंदे (20, जत),अशोक यशवंत चौगुले (सांगली) यांचा समावेश आहे.

परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराची विनावाहक एसटीबस सायंकाळी पाच वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे येत होती.या मार्गावरील चोकाकजवळ एसटी आली असता मुसळधार पाऊसामुळे वादळी सारा सुटला.त्यामुळे चालक रमेश ढवाळ यांना दर्शनीबाजूचे काहीही स्पष्ट दिसत नव्हते.

भरपावसात समोरहून येणार्‍या रिक्षाला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाने रस्त्याच्या एका बाजूला एस.टी. घेण्याचा प्रयत्न केला. नेमके त्याचठिकाणी खड्डा असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि क्षणार्धात एस.टी. रस्त्याच्या एका बाजूला पलटी होऊन पुन्हा पूर्ववत झाली. एकमेकांच्या अंगावर पडल्याने प्रवासी गंभीर जखमी झाले.

ग्रामस्थांनी जखमींना एसटी.तून बाहेर काढून 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयकडे हलविले. परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर आगाराचे डेपो मॅनेजर डी. एम.पाटील, वाहतूक व्यवस्थापक आर. एम. सुभेदार, शिफ्ट इन्चार्ज आय.एच.मुजावर आदींनी रात्री शासकीय रुग्णालयात भेट घेऊन रुग्णांची विचारपूस करून तातडीचे अर्थसहाय्य केले. हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांनीही जखमींची विचारपूस केली.