Mon, Nov 19, 2018 13:17होमपेज › Kolhapur › ST Strike : खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

ST Strike : खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

Published On: Jun 08 2018 1:40PM | Last Updated: Jun 08 2018 1:24PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या बस स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. एसटी महामंडळाच्या कोल्हापूरातील स्थानकावर प्रवाशांची लूट सुरु आहे. कोल्हापूर ते निपाणीसाठी खासगी वाहतूकवाले एका माणसामागे 300 रुपये उकळत आहेत. तर कोल्हापूर ते सांगली या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून खासगी वाहतूकधार 200 रुपयांची मागणी करतानाचे चित्र बसस्थानक परिसरात पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर विभागाचे शंभर टक्के कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा दर्शवला आहेय  कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. इंटक राज्य महिला संघटक  सारिका शिंदे इंटक राज्य महिला संघटक राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकतर्फी वेतन वाढ केली आहे. त्यांनी एकप्रकारे हा निर्णय आमच्यावर लादला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. या संपात  कोणत्याही राजकीय नेत्याचा पाठिंबा नाही. आक्रोश व्यक्त करण्यासाठी आम्ही  स्वंयकृतीने काम बंद आंदोलनात सहभागी झालो आहोत. आतापर्यंत या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री रावते  यांनी कोणताही संपर्क केलेला नाही, असेही शिंदे यांनी सांगितले. 

एसटी बस सेवा बंद असल्यामुळे कोल्हापूर  मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. चौकशीदरम्यान त्यांना दुपारपर्यंत व्यवस्था होईल, असे सांगण्यात येत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. ताटकळत उभे रहावे लागत असल्यामुळे प्रवासी अक्षरश: वैतागले आहेत.