Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Kolhapur › कोल्हापूर ‘एसआयटी’ कोणत्याही क्षणी रवाना

कोल्हापूर ‘एसआयटी’ कोणत्याही क्षणी रवाना

Published On: Jun 18 2018 1:32AM | Last Updated: Jun 18 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकातील विशेष पथकाने अटक केलेला संशयित परशुराम वाघमारे याच्या चौकशीवर महाराष्ट्र एसआयटीचे लक्ष आहे. वाघमारेकडून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत कोणताही धागा मिळाल्यास त्याला ताब्यात घेण्याची तयारी कोल्हापूर पोलिस करीत आहेत. यासाठी पथक तयार करण्यात आले असून कोणत्याही क्षणी वाघमारेचा ताबा घेण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस सूत्रांनी वर्तवली. 

गौरी लंकेश, कॉम्रेड पानसरे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एस. कलबुर्गी यांची हत्या एकाच हत्यारातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अद्याप फॉरेन्सिक लॅबचा अहवाल ‘एसआयटी’कडे  उपलब्ध झालेला नाही. 

लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुराम वाघमारेसह सहा जणांना अटकही करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसआयटी पथक कर्नाटक विशेष पथकातील प्रमुख अधिकार्‍यांसोबत सतत संपर्कात आहे. परशुराम वाघमारे याचा कोल्हापुरात वावर होता का? त्याचा पानसरे हत्येशी संबंध आहे का? या अनुत्तरीत प्रश्‍नांची उत्तरे वाघमारेचा ताबा मिळाल्यानंतर मिळणार आहेत.