कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी
रग्गेडियन तर्फे क्रीडानगरी कोल्हापुरात 11 फेब्रुवारी रोजी डीवायपी कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. याला शहर-ग्रामीण, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातील स्पर्धकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. बालचमू, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, मॅरेथॉनची तयारी म्हणून लाँग प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि. 21 रोजी सकाळी साडेसहा वाजता, सेंट झेवियर्सपासून या रनला प्रारंभ होईल. यात अबालवृद्धांनी सहपरिवार सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
मॅरेथॉनचे दैनिक ‘पुढारी’ असोसिएट पार्टनर असून टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर आहेत. डी. वाय.पाटील ग्रुप हे टायटल स्पॉन्सर असून कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा ग्रुप सिल्व्हर स्पॉन्सर, जे. के. ग्रुप व्हल्चर ऑफ, कोरगावकर पेट्रोल पंप, कोंडुसकर ट्रॅव्हल्स, आयनॉक्स यांचे सहकार्य लाभले आहे. हॉट फ्राय डे टॉल्क्स हे लाईफस्टाईल पार्टनर आहेत. कोल्हापूर मनपाचे विशेष सहकार्य लाभत आहे.
स्पर्धेसाठी ww.kolhapurrun.com व www.ruggedian.com या संकेतस्थळावरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची नाव नोंदणी ही रग्गेडियन स्टोअर्स डीवायपी मॉल तिसरा मजला, डी. टी. कारेकर सराफ घाटी दरवाजा अंबाबाई मंदिर समोर, रग्गेडियन ऑफिस आमात्य टॉवर, चौथा मजला दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर आदी ठिकाणी सुरू असून याठिकाणी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. यासाठी शुल्क आकारणी असणार आहे. यामध्ये ग्रुप आणि कार्पोरेट नोंदणीस सवलत दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेतील नाव नोंदणीचे अर्ज घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली असून मॅरेथॉन संदर्भातील अधिक माहितीसाठी 9623688883 किंवा 8806226609 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.
100 कि. मी. चॅलेंज फ 53 स्पर्धकांकडून फत्ते
स्पर्धेसाठीची स्पर्धकांची क्षमता तयार करण्याच्या उद्देशाने संयोजकांतर्फे नुकतीच 100 कि. मी. चॅलेंज स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यापैकी 53 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. या उपक्रमामुळे अनेक स्पर्धकांना मॅरेथॉनसाठी आपल्याकडे असणारी कमतरता लक्षात आली असून त्यांनी त्या दूर करण्यासाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. तर हे चॅलेंज यशस्वीरीत्या पूर्ण करणार्या स्पर्धकांनी याही पेक्षा सरस कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.