Sat, Jul 20, 2019 15:03होमपेज › Kolhapur › ‘रग्गेडियन कोल्हापूर रन’ मॅरेथॉनचा 7 तास थरार

‘रग्गेडियन कोल्हापूर रन’ मॅरेथॉनचा 7 तास थरार

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 12 2018 12:44AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी

पहाटेचा अंधार, धुक्याने माखलेले रस्ते आणि कडाक्याच्या थंडीत ‘रग्गेडियन कोल्हापूर रन’ मॅरेथॉन प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात झाली. सुमारे 15 हजार आबालवृद्धांनी मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून थंडी-धुके  यांची पर्वा न करता 50, 21, 10 व 5 कि.मी. अंतराच्या स्पर्धा यशस्वीरीत्या पार केल्या. यात बालचमू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह प्रचंड होता. दिव्यांग खेळाडूंनीही ‘हम भी किसीसे कम नही...’ अशा आवेशात मॅरेथॉन पूर्ण केली. पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल सात तास मॅरेथॉनचा थरार सुरू होता. यामुळे अवघे शहर थबकले होते.

रविवारी पहाटे मॅरेथॉनचा प्रारंभ सेंट झेव्हियर्स हायस्कूलपासून झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर सौ. स्वाती यवलुजे व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, संजय डी. पाटील, ऋतुराज पाटील, राजवीर व तेजराज योगेश जाधव, कॉसमॉस बँकेचे सुहास गोखले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफने मॅरेथॉनची सुरुवात झाली.  यावेळी संयोजक आकाश कोरगावकर, उपल शहा, राज कोरगावकर, अमोल कोरगावकर, वृषभ शहा, जितेंद्र शहा, जयेश ओसवाल आदींची

उपस्थिती होती.
क्रीडानगरी कोल्हापुरात रविवारी ‘हिट 24 ग्रुप प्रेझेंटस् डीवायपी रग्गेडियन कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन 2018’ हा मोठा स्पोर्टस इव्हेंट जल्लोषात साजरा झाला. यात देशाच्या विविध राज्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 15 हजार आबालवृद्ध स्पर्धक सहभागी झाले होते. खेळाडू, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार-उद्योजक-व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, राजकीय लोक, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, गृहिणी, नोकरदार महिला व ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध क्षेत्रातील सर्वसामान्यांपासून ते मान्यवर व्यक्तींपर्यंत प्रत्येक घटकाचा समावेश होता. अनेक जण सहकुटुंब, मित्र परिवारासह मॅरेथॉनमध्ये धावले.

दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर, तर टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर होते. हिट 24 ग्रुप प्रेझेंटिंग पार्टनर, तर डीवायपी गु्रप टायटल स्पॉन्सरर आहेत. विद्या प्रबोधिनीच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्यून शहा गु्रप व जे. के. ग्रुप व्हेंचर सिल्व्हर स्पॉन्सर,  हॉट फ्रायडे टॉक्स लाईफस्टाईल पार्टनर, इन्स्टिक्ट मीडिया डिजिटल पार्टनर, हॉटेल थ्री लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर, डॉक ऑन लाईन हेल्थ पार्टनर, कोंडूसकर ट्रॅव्हल पार्टनर, जुहू हाफ मॅरेथॉन स्पोर्टस् पार्टनर, तर कोल्हापूर मनपा व महाराष्ट्र पोलिस यांच्या विशेष सहकार्याने ही मॅरेथॉन झाली.

मान्यवरही धावले...
रग्गेडियन कोल्हापूर रन मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी संयोजकांनी अस्सल कोल्हापुरी रांगड्या भाषेत ‘...यायला लागतंय’ अशा सुरात ‘...पळायला लागतंय’, असे आवाहन करून सर्वत्र तसे आवाहन करणारे फलक लावले होते. त्यानुसार हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. महत्त्वाचे म्हणजे मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांनाही धावण्याचा मोह आवरता आला नाही. दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, राजवीर व तेजराज जाधव, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, ऋतुराज पाटील यांनी मॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभाग नोंदविला. याशिवाय जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, विश्‍वविजय खानविलकर, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर उपअधीक्षक सूरज गुरव, कृष्णात पिंगळे, अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, वकील, डॉक्टर, पोलिस अधिकारी,  शिक्षक, उद्योजक, व्यापारी, बँका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

मराठमोळी संस्कृती अन् वेस्टर्न कल्चरचा मिलाफ...
खेळाबरोबरच करमणुकीच्या कार्यक्रमांच्या विविधतेने कोल्हापूर रन मॅरेथॉन परिपूर्ण ठरली. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जमणार्‍या हजारो क्रीडाप्रेमींचीही काळजी संयोजकांनी आवर्जून केली. त्यांच्या करमणुकीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण मॅरेथॉनच्या मार्गावर करण्यात आले होते. मराठमोळ्या संस्कृतीपासून ते वेस्टर्न कल्चरच्या विविधतेने करमणुकीचे कार्यक्रम नटले होते. शिवकालीन युद्धकला पथकाची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेझीम व  झांजपथकाचा ठेका, भरतनाट्यम, शिस्तबद्ध पोलिस बँड, उत्साही ढोलताशा पथक, हलगी-घुमके-कैचाळ-तुतारी पथक यांच्यासह डी.जे.वर वाजणारी वेस्टर्न कल्चरची गाणी, यामुळे उत्साही वातावरण निर्मिती झाली होती. यात कोल्हापूर पोलिस दलाचा बँड, नागदेववाडी मर्दानी खेळ व हलगी पथक, छत्रपती प्रतिष्ठान ढोलताशा पथक, तुतारीवादक महेश यादव, झुंबा डान्स ग्रुप अशा ग्रुप्स्नी आपल्या कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

खेळाडूंच्या भुकेची काळजी...
मॅरेथॉनमधील विविध वयोगट व प्रकारात सहभागी हजारो खेळाडूंच्या भुकेची काळजीही संयोजकांनी आवर्जून घेतली होती. संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, एनर्जी ज्यूस आणि फळांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंकरिता भरपेट नाष्टाही ठेवण्यात आला होता. सेंट झेव्हियर्सच्या पूर्वेकडे असणार्‍या मैदानावर खेळाडूंच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. पोहे, उपिट, केक, केळी, चहा असा भरपेट नाष्टा खावून खेळाडू डी.जे.च्या तालावर थिरकण्यासाठी रिचार्ज झाले. 

सहभाग प्रमाणपत्र व पदकांसाठी झुंबड...
मॅरेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकांना पांढर्‍या रंगाचे टी-शर्ट देण्यात आले होते. टी-शर्टच्या पुढील बाजूस रग्गेडियनचा सिम्बॉल, तर पाठीवर ‘प्राऊड इंडियन’ अर्थात भारतीय असल्याचा गर्व व्यक्त करणारे तीन रंग झळकत होते. मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर खेळाडूंना प्रमाणपत्र व पदक देण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी खेळाडूंची अक्षरश: झुंबड उडाली होती. पदक घेतल्यानंतर ठिकठिकाणी उभा करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटस्वर जाऊन प्रत्येक खेळाडूने आवर्जून सेल्फी काढले. संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंगसाठी कॅमेरामन सज्ज होते. याशिवाय एरियल व्ह्यूसाठी ड्रोन कॅमेर्‍याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

वैशिष्ट्यांनी परिपूर्ण मॅरेथॉन...
रग्गेडियन कोल्हापूर रन भारतातील सर्वात पहिली ऑन सिटी रोड अल्ट्रा मॅरेथॉन आहे. कोल्हापुरातील सर्वात मोठी मॅरेथॉन असून देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात यात स्पर्धक सहभागी झाले. भारतातील एकमेव मॅरेथॉन ज्यांचे सर्व पेसर हे आयर्नमॅन फिनिशर्स आहेत. कोल्हापुरात पहिल्यांदाच टाईम चीप तंत्रज्ञान, फिनिशर्स मेडल, ऑन रुट मनोरंजन, पेसरची संकल्पना, एक्स्पो, अ‍ॅम्बेसेडर संकल्पना, ऑनलाईन नोंदणी यासारख्या संकल्पना रग्गेडियनने आणल्या. बालचमू, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या सहभागाने मॅरेथॉन गाजली. 

क्रीडानगरी कोल्हापुरात रविवारी ‘हिट 24 ग्रुप प्रेझेंटस् डीवायपी रग्गेडियन कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन 2018’ हा मोठा स्पोर्टस् इव्हेंट जल्लोषात साजरा झाला. यात देशाच्या विविध राज्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 15 हजार आबालवृद्ध स्पर्धक सहभागी झाले होते. खेळाडू, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार-उद्योजक-व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, राजकीय लोक, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, गृहिणी, नोकरदार महिला व ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध क्षेत्रातील सर्वसामान्यांपासून ते मान्यवर व्यक्तींपर्यंत प्रत्येक घटकाचा समावेश होता. अनेक जण सहकुटुंब, मित्र परिवारासह मॅरेथॉनमध्ये धावले.

दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर, तर टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर होते. हिट 24 ग्रुप प्रेझेंटिंग पार्टनर, तर डीवायपी गु्रप टायटल स्पॉन्सरर आहेत. विद्या प्रबोधिनीच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्यून शहा गु्रप व जे. के. ग्रुप व्हेंचर सिल्व्हर स्पॉन्सर,  हॉट फ्रायडे टॉक्स लाईफस्टाईल पार्टनर, इन्स्टिक्ट मीडिया डिजिटल पार्टनर, हॉटेल थ्री लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर, डॉक ऑन लाईन हेल्थ पार्टनर, कोंडूसकर ट्रॅव्हल पार्टनर, जुहू हाफ मॅरेथॉन स्पोर्टस् पार्टनर, तर कोल्हापूर मनपा व महाराष्ट्र पोलिस यांच्या विशेष सहकार्याने ही मॅरेथॉन झाली.

मॅरेथॉन मार्गाच्या दुतर्फा क्रीडाप्रेमी एकवटले...
क्रीडानगरी कोल्हापुरात प्रत्येक खेळाला लोकाश्रय मिळतोच. पारंपरिक खेळापासून आधुनिक गेम्सपर्यंत प्रत्येक प्रकारांना क्रीडाप्रेमी भरघोस पाठबळ देतात. कोल्हापूर रन मॅरेथॉन याला अपवाद नव्हते. मॅरेथॉनच्या संपूर्ण मार्गाच्या दुतर्फा क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मॅरेथॉनमध्ये सहभागी आबालवृद्ध स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या, शिट्ट्या आणि जयघोष केला जात होता.  50, 42, 21, 10 आणि 5 कि.मी. अशा विविध अंतराच्या या मॅरेथॉनचा मार्ग सेंट झेव्हियर्स हायस्कूल- पोलिस मैदान चौक -धैर्यप्रसाद हॉल चौक - सर्किट हाऊस - लाईन बझारपासून पुन्हा फिरून सर्किट हाऊस - धैर्यप्रसाद चौक - ताराराणी चौक (कावळा नाका)- डीवायपी सीटी मॉल- उड्डाणपूल मार्गे- शिवाजी विद्यापीठ- शाहू नाकामार्गे पुन्हा परतीच्या मार्गावरून सेंट झेव्हियर्स (स्टार्टिंग पॉईंट) असा होता.