Thu, Jul 18, 2019 04:54होमपेज › Kolhapur › जयसिंगपूर येथे तीन लाखांची बॅग पळवली  

जयसिंगपूर येथे तीन लाखांची बॅग पळवली  

Published On: Dec 15 2017 5:05PM | Last Updated: Dec 15 2017 5:04PM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर येथे तीन लाख रूपयांची बॅग चोरट्यांनी पळवली आहे. बँकेतून रक्कम काढून घराचे गेट उघडून आत जाताना चोरट्याने बॅगवर डल्ला मारला. चंद्रकांत गणपती गुजर (वय, ५९, रा. साई मंदिर प्लॉट नंबर ४९९/२ शाहूनगर) यांनी बँक ऑफ इंडियामधून दोन लाख रुपये तर, महाराष्ट्र बँकेतून एक लाख रुपयांची रक्कम काढली. गुजर यांनी ती रक्कम  बॅगेत ठेवून ती बॅग अॅक्टिव्हा मोपेडच्या डिक्की खाली ठेवली होती.

घराचे गेट उघडून ते बॅग काखेत मारून घरात जाताना एका चोरट्याने हिसडा मारून बॅग पळविली. दुसरा चोरटा मोटारसायकल सुरू करून उभा होता.  त्या गाडीवर बसून दोघे पसार झाले. दुपारी सव्वा बारा वाजता शाहू नगरातील साई मंदिरजवळ ही चोरी झाली.

मुलाला फ्लेक्स मशीन घेण्यासाठी गुजर यांनी ही रक्कम काढली होती. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करताना चंद्रकांत गुजर हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या उजव्या  हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत गुजर यांनी फियार्द  दिली आहे.