Sat, Feb 23, 2019 04:01होमपेज › Kolhapur › सापडलेले  ५ लाख रूपये रेल्‍वे पोलिसांकडून परत 

सापडलेले  ५ लाख रूपये रेल्‍वे पोलिसांकडून परत 

Published On: Dec 08 2017 1:37PM | Last Updated: Dec 08 2017 1:37PM

बुकमार्क करा

कोल्‍हापूर : प्रतिनिधी

सांगली येथे नुकत्‍याच घडलेल्‍या अनिकेत कोथळे खून प्रकरणापासून जनतेत पोलिसांबाबत कमालीची नाराजी आहे. मात्र, खाकीच्या आतही माणुसकी असते. याचे उदाहरण समोर आले आहे. कोल्‍हापूर रेल्‍वे पोलिसांना रेल्‍वेत सापडलेली पाच लाख रूपयांची बॅग पोलिसांनी प्रामाणिकपणे परत केली आहे. 

कॉन्स्टेबल विशाल माने यांना महालक्ष्मी एक्‍स्प्रेसच्या एस-११ या डब्‍यात एक बेवारस बॅग सापडली होती. त्‍यांनी बॅगमध्ये पाहिल्‍यानंतर बॅगमध्ये पाच लाख रुपये एवढी रक्‍कम असल्‍याचे त्‍यांच्या लक्षात आले. या बॅगबाबत अधिक चौकशी केली केल्‍यानंतर ही बॅग मुनिसुव्रनाथ दिगंबर जैन जिनालय ट्रस्ट, जबलपूर यांची असल्‍याचे समोर आले. पोलिसांनी जैन यांच्याशी संपर्क साधून त्‍यांना ही बॅग परत केली आहे. कॉन्स्टेबल विशाल माने यांच्या  प्रामाणिकपणाबद्दल पोलिस खात्यात कौतुक होत आहे.