Thu, Jan 24, 2019 06:30होमपेज › Kolhapur › रोहनची आत्महत्या नसून घातपात; वडिलांची फिर्याद

रोहनची आत्महत्या नसून घातपात; वडिलांची फिर्याद

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 16 2018 1:37AM

बुकमार्क करा
पट्टणकोडोली : वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली अनंत विद्यामंदिर व न्यू इंग्लिश स्कूल (न्यू राजापूर) च्या वतीने 4 जानेवारीला रात्री नवचेतना शिबिरावेळी तळंदगे येथील रोहन सदाशिव चौगुले (वय 16) या दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन वर्गातच आत्महत्या केली. रोहनच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्‍त करीत शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

रोहनचे वडील सदाशिव चौगुले यांनी ही आत्महत्या नसून घातपाताचा संशय व्यक्‍त केला. तसेच याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हुपरी पोलिस ठाण्याचे सपोनि नामदेव शिंदे यांच्याकडे  केली. निवेदनावर वडिलांसह चुलते महादेव चौगुले यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना नागरिक व नातेवाईक  उपस्थित होते.